सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या रक्त, मांस,आणि घामाचे शिंपणातून बहरलेल्या संजीवनी वटवृक्षाच्या छायेत लाखों विद्द्यार्थ्यांनी संजीवनी बोधामृताचा लाभ घेतला :– बिपिन कोल्हे
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या रक्त, मांस,आणि घामाचे शिंपणातून बहरलेल्या संजीवनी वटवृक्षाच्या छायेत लाखों विद्द्यार्थ्यांनी संजीवनी बोधामृताचा लाभ घेतला :– बिपिन कोल्हे
🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क
कोपरगांव. —
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांनी चाळीस वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला मध्यवर्ती असलेल्या पठारावरील कोपरगाव तालुक्यात ग्रामीण औद्योगिक, आर्थिक विकासाला बळकटीतून स्थानिक पातळीवर प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याकरिता संजीवनी शिक्षण संस्थेचे बीजारोपण केले. यासाठी अहोरात्र जिद्दीने घेतलेल्या परिश्रमातून रक्त, मांस,व घामाचे शिंपणातून बहरलेल्या वटवृक्षात रुपांतर करण्यात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यशस्वी झाले.
या वटवृक्षाच्या छायेत लाखों विद्द्यार्थ्यांनी संजीवनी बोधामृताचा लाभ घेतला. या बाळकडूने अत्याधुनिक तंत्रज्ञान व विकसित युगात सबल झालेल्या विद्द्यार्थ्यांनी केवळ देशातच नव्हे तर जागतिक पातळीवरील उद्दोग आणि आर्थिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कर्तबगारीचा सर्वोत्तम ठसा उमटवला. याचमुळे संजीवनी अभियांत्रिकी, फार्मसी आदी शाखांची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध उद्योग आणि विद्यापीठाशी
नव नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान संशोधन, सुविधा, शैक्षणिक अभ्यासक्रम अंमलबजावणी ,रोजगार निर्मिती , विद्यार्थी प्रशिक्षण आणि देवाणघेवाण आदी क्षेत्रात यशस्वी सामंजस्य देवयंतदिवसेंदिवस वाढत आहे. अभ्यास, शिक्षण पद्धतीत आता आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे,
पूर्वी अभ्यासाचे संदर्भ शोधायला खूप काळ जायचा परंतु आता भ्रमणध्वनी, माहितीचे महाजाल माध्यमातून ते सहज साध्य होत आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धात्मक परिक्षेत चमकले पाहिजे यासाठीच्या सर्व पायाभुत सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला पाठबळ दिले त्यामुळेच स्वाती होन सह अनेक विद्यार्थी स्पर्धात्मक परिक्षेत उत्तीर्ण झाले.
संजीवनी अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत कुमारी स्वाती हिने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणाबरोबरच स्पर्धात्मक परीक्षा अभ्यासाचे मार्गदर्शन येथे दिले जाते, विद्याथ्यांनी जीवनात ध्येय बाळगावे आणि त्याच्या परिपुर्तीसाठी अभ्यास करावा. प्रत्येक माता- पिता आणि गुरुजन विद्यार्थ्यांना घडविण्यांसाठी पुढाकार घेत असतो. कुमारी स्वातीच्या यशामुळे तिच्या आई वडीलांचा नावलौकीक आणखी वाढला आहे. स्पर्धात्मक परीक्षा ह्या विद्यार्थी दशेला आकार देत असतात.
यात अपयश आले तरी विद्यार्थ्यांनी घाबरून जायचे नसते. कुमारी स्वाती होन हिने प्रशासकीय कामकाज समजुन घेऊन जीवनांतील सर्वोच्च पदावर जावे,.ही सदिच्छा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी स्वाती होन हिचे संजीवनी उद्योग व शिक्षण समूहाचे वतीने करण्यात आलेल्या सत्कार प्रसंगी व्यक्त केली
याप्रसंगी उपाध्यक्ष मनेष गाडे, संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, त्र्यंबकराव सरोदे, निलेश देवकर, सतिष आव्हाड, निवृत्ती बनकर, बाळासाहेब वक्ते, रमेश घोडेराव, शरद थोरात, नामदेव होन, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव तुळशीराम कानवडे, सभासद, शेतकरी, खाते प्रमुख, उपखाते प्रमुख आदि उपस्थीत होते. शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.