कोपरगाव राहाता, तालुक्यात राष्ट्रीय कॅलिफोर्निया पूर्ननिर्मिती घडविण्यासाठी संघटित व्हा :– कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलता कोल्हे
कोपरगाव राहाता, तालुक्यात राष्ट्रीय कॅलिफोर्निया पूर्ननिर्मिती घडविण्यासाठी संघटित व्हा :– कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलता कोल्हे
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव :– साठ वर्षांपूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोपरगाव, श्रीरामपूर परिसराला जाहीर सभेत भारतीय कॅलिफोर्निया म्हणून गौरविले होते. परंतु आज याउलट परिस्थिती केवळ राजकीय मत्सरी असुयेच्या अतिरेकाने उद्भवली आहे.
आपणास सुदैवाने केंद्र व राज्य सरकारांचा वरदहस्त लाभल्यामुळे कोपरगाव, राहाता , तालुका हा पठारी तसेच नऊही दिशांनी संपूर्ण देशातील सर्व कानाकोपऱ्यातील शहरी – ग्रामीण भागाला समान पातळीवर जोडणारा महत्वपूर्ण प्रदेश आहे. याचं महत्त्व ब्रिटिश सरकारने ओळखून रेल्वे व लष्करी सुविधेच्याबळावर संपूर्ण देशावर अवघ्या हजाराचे आतील ब्रिटिशांनी दिडशे वर्षे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
आपणा सर्वांच्या पुण्याईने संपूर्ण भारताला सर्वच क्षेत्रात अव्वलस्थानी नेणारा जिद्दी पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी यांच्या रुपाने लाभला.म्हणूनच आपणास मुंबई आणि ईशान्य , पूर्व राज्यातील कानाकोपऱ्यात व परदेशात वाहतूक सुविधा पुरविण्यासाठी समृद्धी महामार्ग, एवढेच नव्हे तर अतिजलद बुलेट प्रवासी आणि मालवाहतूक ट्रेन अल्पावधीत सुरू झाल्यावर नवल वाटणार नाही. त्यामध्ये कोकमठाण येथे थांबा देण्याचे व समृद्धी महामार्गलगत अत्याधुनिक तंत्रज्ञान व विकसित दोन नवनगरे उभारून नगर सोलापूर, पुणे, नासिक , जळगांव , धुळे जिल्ह्यातील कृषी, औद्योगिक, दुध दुभते, फळफळावळ, विविध सेवासह आदी माल पाठविण्याची देशातील कानाकोपऱ्यात कमी वेळ,श्रम, खर्चात पाठविण्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील श्रीसाईबाबा विमानतळ , दुहेरी रेल्वे मार्ग,सुरत – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग, लाभले.
पन्नास वर्षांपासून निळवंडे धरणाचे पाण्यापासून वंचित असलेल्या संगमनेर, कोपरगाव राहुरी , श्रीरामपूर, सिन्नर तालुक्यातील जनतेला भाजप,मित्र पक्षांच्या राज्य शासनाने निळवंडे धरणातून कालव्यातून पिण्याचे पाणी वाटप करण्यासाठी यशस्वी योजना राबविली. तसेच राहाता,शिर्डी , कोपरगावातील वाढत्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी निळवंडे धरणातून थेट बंद जलवाहिनीतून देण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात मंजूरी देऊन आर्थिक तरतूद करण्यात आली परंतु या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू झाल्यावर विरोधकांनी शेजारच्या मदतीने संभाजीनगर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हरकत याचिका दाखल करुन काम थांबवले.यापूर्वी संगमनेर शहराला निळवंडेचे पाणी दिल्यानंतर कोणीच न्यायालयात धाव घेतली नाही. पण देवादारी खऱ्या सत्याला न्याय मिळतोच दोन वर्षांचे आत उच्च न्यायालयाने या तिन्ही विकसित शहरांना तातडीने पाणी देण्याचा राज्य शासनासआदेश दिला. परंतु सत्ताधारी नविन शासनाने हा आदेश फाईल ब़द केला.
याशिवाय लवकरच युद्धपातळीवर एक वर्षाच्या आत निळवंडे डाव्या आणि उजव्या कालव्यांची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.यातही आमचे विरोधक कटकारस्थान करून अडथळे आणून विनासायास मराठवाड्यास आपले पाणी पुरवून काय साधणार हे कळत नाही .
रस्ते, पाणी, आरोग्य, निवास,वीज यासाठी अब्जावधी रुपयांची तरतूद करुन ही कामे युध्द पातळीवर पूर्ण केली जात आहे. कोपरगाव व राहाता तालुक्यात ५०० एकरात नविन औद्योगिक वसाहत मंजूर करण्यात यश आले असून याकरिता राज्य शासनाकडून स्वतःच्या ताब्यातील जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ . स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव नागरी सत्कार समारंभात अध्यक्ष पदावरून बोलतांना दिली.
कोपरगाव नागरी सत्कार समिती तर्फे आपला मान आपला अभिमान या उपक्रमात कोपरगावांतील यशस्वी मान्यवरांचा नागरी जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला यात राष्ट्रीय धन्वंतरीआयुर्वेद अवॉर्ड प्राप्तकर्ते राष्ट्रीय आयुर्वेद महागुरु आयुर्वेदाचार्य रामदास म्हाळुजी आव्हाड
,राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णपदके व धावणे स्पर्धेत दोन सिल्वर आणि एक कांस्यपदक मिळविल्याबद्दल
डॉ. सुषमा विलास आचारी.
अमेरिकेत असलेल्या अती प्राचीन जैन धर्मिय पवित्र लब्जी सार ग्रंथाचा अमेरिकेत १४ वेळा जावून अध्यात्म आणि विज्ञानाच्या कसोटीवर चिकित्सक पणे हिंदीत अनुवाद केल्याबद्दल
डॉ. अभय खुशालचंद दगडे कोपरगाव पिपल्स बँकेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र मोतीलाल शिंगी कोपरगाव मर्चंट असोसिएशन चेअरमन
अतुल धनाजी काले कोपरगाव मर्चंट असोसिएशन उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राजेश कैलासचंद्र ठोळे यांचा जाहीर नागरी सत्कार प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना सौ.स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या,
गाव करील ते राव काय करील या सूत्रानुसार एकटा माणूस काहीच करू शकत नाही यासाठी एकत्र यावे लागते याकरिता सर्वांनी आपले राजकीय ,वैयक्तिक मतभेद विसरून या कामासाठी एकत्र येण्याची गरज आहे कोणतेही सार्वजनिक कामाचे यश एकट्याचे नसते त्याला सर्वांचाच हातभार लागतो फक्त ते सर्वांनीच केले तर शक्य होते म्हणून सर्वांनी कोपरगाव तालुक्याचा पुन्हा कॅलिफोर्निया होण्यासाठी एकत्र यावे असे कळकळीचे आवाहन कोपरगावातील पहिल्या महिला आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले .
गेल्या ६५ वर्षांपासून कर्मवीर स्व. शंकरराव काळे, सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे पद्मभूषण माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे ,भाजपचे प्रदेश अध्यक्ष माजी खासदार स्व..सूर्यभान वहाडणे , विधान परिषद सभापती स्वर्गीय प्रा. ना.स. फरांदे ,माजी खासदार ॲड. स्व . भीमराव बडदे, माजी आमदार स्व.के.बी. रोहमारे, माजी आमदार स्व. मोहनराव गाडे स्व. नामदेवराव परजणे, स्व.गणपतराव औताडे ,स्व.पंडीतराव जाधव आदी राज्य पातळीवरील कर्तबगार नेत्यांनी अनेक वेळा टोकाचे राजकारण केले. तरीही तालुक्यातील विकासासाठी गरजेनुसार त्यांनी एकत्रित लढतांना प्रामाणिकपणे सर्वस्व पणाला लावले. याचबरोबर त्यांनी एकमेकांवर चिखलफेक करतांना कधीच आपल्या मानापानाच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत. विश्वास घातकी राजकारण करुन कोणाला अथवा जनतेला फसविले नाही. अशा महान नेत्यांच्या महान प्रामाणिक कर्तबगारीवर त्यांच्या पश्चात चिखलफेक करणे हे सुर्यावर थुंकण्यासारखे शरमेचेआहे. एखाद्याची कार्यपध्दती पटली नाही तर त्यांच्या लाभापासून वंचित करण्यात आपली ताकद खर्च करण्यापेक्षा याच ताकदीच्या बळावर दुसरे कार्य करण्यात महानत्व दडल आहे.
दुर्दैवाने गेल्या चाळीस वर्षे आपण फुटीरतेचे बळास पोसल्याने आपणच आपल्या पायावर धोंडे पाडून घेऊन अपंग बनल्याने आपणास इतरांच्या कुबड्या घेऊनही यशस्वी होत नाही अशी शेजाऱ्यांसह आमच्या विरोधकांची दयनीय अवस्था झाली आहे हेही जनतेने ओळखून राहाता तालुक्यातील ग्रामपंचायत व गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत धक्कादायक धडा शिकवला आहे
कोपरगाव आणि राहाता तालुक्यात प्रवरा, संजीवनी ,कोपरगाव, गणेश सहकारी साखर कारखाने ६०वर्षापासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उभे राहिले व चालू आहेत अहमदनगर जिल्हा सहकारी बँक उभारणीत तालुक्यांतील नेत्यांचा सिंहाचा वाटा होता व आहे. गोदावरी प्रवरा खरेदी विक्री संघ, गोदावरी खोरे दूध उत्पादक संघ, के जे सोमय्या महाविद्यालय ,सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स संजीवनी वाणिज्य व गौतम कला महाविद्यालय , देशात पातळीवरील पहिल्या दहा मधील अशासकीय संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज,रयत शिक्षण संस्थेची तालुक्यातील विद्यालये, कोपरगाव तालुका जिनिंग प्रेस , कोल्हापूर टाईप सहा बंधारे आदी नावाजलेले प्रकल्प आर्थिक दृष्ट्या प्रगत आहेत. या संस्थांचा शहरं व ग्रामीण विकासात खंबीर व मजबूत पाया शहरं,तालुका विकासासाठी नव्हे तर राज्यातील ग्रामीण विकासाचा मार्गदर्शक आधार ठरला आहे.याप्रकल्पांमुळे तालुक्यातील आपणासह जनतेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ मिळतो. हे न विसरता भावी काळात यापेक्षा भुतो न भविष्यती विकासत्मक कामगिरी करण्यासाठी सर्वांनी खुल्या मनाने संघटीत झालों नाही तर भावी पिढी तुम्हा-आम्हाला कधीच माफ करणार नाही.
अशा परिस्थितीत गेल्या पंधरा वर्षांपासून शेजारच्या नेत्यांनी कोपरगाव तालुक्यात दुहीच्या राजकारणातून दुहीची बीजे पेरून तालुका उध्वस्तीकरणाचा घाट घातला जात आहे. दुर्दैवाने आमचें काही युवक युवती बळी पडल्याने सर्व विरोधकांनी माझ्या विरोधात दोन विधानसभा निवडणुकी लढविल्या यापैकी एका निवडणुकीत मी २९हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले
तर दुसऱ्या निवडणुकीत आमच्या मित्र पक्षांच्या वरिष्ठ पक्ष नेत्यांनी अचानक मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा नाईलाज झाला. व माझा सर्व जिल्हा आणि राज्य पातळीवरील नेते माझ्या विरोधात एकत्र येऊनही अल्पशा मतांनी पराभव झाला. आमच्या शेजारच्यासह सर्वं एकत्र येऊनही त्यांना हवे तसे यश लाभले नाही.यामुळे ही मंडळी मानसिक दृष्ट्या खचली आहेत याउलट संजीवनी उद्द्योग समूहाचे सहकार्याने स्वबळावर यशस्वी कोरोना उपचार केंद्राद्वारे हजारो रुग्णांचे प्राण वाचविताना शहर व तालुक्यात घरपोच सॅनिटाझर व मास्क सर्व नागरिकांना घरपोच मोफत पुरविले . याकाळात मी मृत्युच्या दाढेतून तर आमचे कुटुंबीय जनतेच्या दुव्याने वाचले.
कोल्हे कुटुंबीयांची सर्वस्व पणाला लावून जनसेवा करण्याची परंपराच असल्याने ६० वर्षांपासून अखंड कोपरगाव शहर आणि तालुक्यातील अशी एकही नैसर्गिक , मानवी सामाजिक व वयैक्तिक समस्या नाही की कोल्हे कुटुंबिय व संजीवनी उद्द्योग समूहाने सर्वस्व पणाला लावले नाही . या संस्कारांच्या बळावर मी व माझे कुटुंबीय सत्तेवर असो अथवा नसो शेवटपर्यंत जिद्दीने अखंड जनसेवा करीत राहीले आणि रहाणार असल्याची ठाम ग्वाही सौ.स्नेहलता कोल्हें यांनी दिली
येत्या दहा वर्षांत साईनगर जिल्हा निर्मितीसह कोपरगाव, शिर्डी,राहाता महानगर पालिका झाल्यावर वाढत्या लोकसंख्येला निळवंडे धरणातून पाणी मिळवि
ण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावणार असल्याचा खंबीर निर्धार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक विवेक कोल्हे यांनी केली
गेल्या साठ वर्षांत कर्मवीर शंकरराव काळे आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांनी राजकारणात कुठे भांडायचे – कुठे थांबायच अथवा कोणाचे सहकार्य घ्यायच- कोणाचा पत्ता कट करायचा याचे आदर्श पाठ महाराष्ट्राला शिकवले परंतु राजकारण्यांच्या लढाईत आपल्या सहकारी संस्था बरोबर विरोधकांच्या सहकारी संस्था मोडीत काढण्यासाठी कधीच अडचणी निर्माण करुन जनतेची रोजी रोटी वर घाला घातला नाहीत
याचमुळे शेजारच्या सह महाराष्ट्रातील कोणत्याही ज्येष्ठ श्रेष्ठ राजकारणी नेत्यांना कोपरगाव तालुक्यात चंचू प्रवेश करता आला नाही त्यांच्या या राजकारणाने आज सर्वच सहकारी संस्था , स्थानिक स्वराज्य संस्था या प्रगतीपथावर आहेत हे आदर्श संस्कार गुंडाळून आमचे काही सहकारी शेजारांच्या या नादी लागून कोपरगाव तालुक्याच्या विकासाला अडथळे आणत आहेत यातूनही त्यांना फक्त शेजारच्या गढीचे मांडलित्व स्विकारण्याची इच्छा असल्यास आमचा नाईलाज आह
याच नेत्याने मागील विधानसभा निवडणुकीत भाजप चे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याची जबाबदारी जाहीररित्या घेतली असूनही फक्त स्वतःची कातडी बचावतांना ३ आमदार पाडण्यासाठी विरोधकांना सहकार्य केले. आगामी निवडणुकीत आमच्यासह भाजपला नुकसान करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न अंगलट येईल. तेव्हा यावेळी कोपरगाव मतदार संघात उमेदवारी निश्चित करुन निवडून आणण्याची ज्यांची जबाबदारी घेतली त्यांनी शेजारच्या पासून सावधानी बाळगण्याशिवाय अन्य पर्यायच नाही. कारण जनतेने आगामी निवडणुक हाती घेतली आहे. जनतेला कायम फसविण्याचे दिवस संपले आहेत . याचा धडा गणेश सहकारी साखर कारखाना आणि राहाता तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या विरोधकांना मिळाला आहे.राहाता तालुक्यातील यांची आमदारकी शिर्डी,राहाता गणेश नगर, पुणतांबा,आश्वि परिसरातील प्रचंड विरोधामुळे अडचणीत आली आहे. हीआमच्या विरोधकांच्या दृष्टीने नामुष्कीच्या पराभवाची नांदी आहे.
कोपरगाव तालुका प्राचिन ऐतिहासिक व धार्मिक तीर्थक्षेत्रे, शिक्षण आणि आरोग्य व्यापार क्षेत्रात अव्वल आहे, येवल्यात औद्योगिकीरणास प्रचंड संधी आहे तर शिर्डी आंतरराष्ट्रीय स्तरावरील श्रीसाईबाबांचे तिर्थक्षेत्र आहे. याशिवाय पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर राज्यात ट्रिपल सरकारांमुळे भूतो न भविष्यती असा क्रांतीकारक रस्ते ,विज , पाणी, दुहेरी रेल्वे मार्गांनी कोपरगाव – राहाता तालुके परिसर देशाच्या औद्योगिक,कृषी , आरोग्य, शिक्षण, व्यापार, दळणवळणानातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत सबल बनविण्यात सिंहांचा वाटा उचलणार आहे.
कोपरगाव राहाता तालुके देशाला सर्वं दिशांनी समान पातळीवर जोडणाऱ्या पठारी प्रदेशात आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा, खानदेश ,नासिक, सोलापूर पुणे जिल्ह्यासह अत्याधुनिक सुविधेतील रस्ते, रेल्वे ,हवाई मार्गाने सहजपणे काही तासांतच नागपूर, मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात,संपर्क साधला जात आहे .
आपल्या ताल़ुक्यात बिन बुलाओ शेजारी पाहुण्यांच्या कारवायांमुळे येथील विकास ठप्प झाला आहे. तो सावरण्यासाठी आगामी काळात कोणत्याही परिस्थितीत गोदावरी पाणलोट क्षेत्रातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून वाया जाणाऱ्या हजारांपेक्षा जास्त टी. एम. सी पाण्यापैकी किमान दीडशे टी. एम .सी. पाणी नासिक , अहमदनगर जिल्ह्यासह मराठवाडयास मिळवून देण्यासाठी संघटीत होणे हा एकमेव मार्ग असल्याने सर्वांनी वयैक्तिक द्वेषपूर्ण असुया, गैर महत्वाकांक्षेचे राजकीय जोडे बाहेर ठेवून संघटीत होण्याचे आवाहन केले.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांनी सलग चाळीस वर्षे न्यायालय विधान मंडळ,संसद, विविध स्वरूपात आंदोलने केली परंतु त्यांना एकाकी पाडण्यात विरोधकांसह स्वकीय आघाडीवर राहिले यांचा भिषण फटका मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्रातील जनतेला बसत असल्याची जळजळीत खंत विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सौ. स्नेहलता कोल्हें यांनी १० वर्षापुर्वी कोपरगाव शहरातील चौथ्या पाणी साठवण तलावाच्या विस्तारीकरणातून गाळ काढण्याचे काम जनतेच्या सहभागातून उभे केले. यासाठी सर्वं थरातील जनतेने श्रमदानाचा धडाकाच लावला. सौ. स्नेहलता कोल्हें स्वतः भर उन्हात कंबर कसून कामाला जुंपल्या . यावेळी कोपरगाव करांनी व संजीवनी उद्योग समूहाने आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळ पुरविले परंतु हे काम पूर्णत्वास गेल्यास आपली खैर नाही. या भितीने विरोधकांनी बालीश पणे काम बंद पाडले. याउलट आपण हे काम तातडीने पूर्ण करू अशा वल्गना करीत आमदार आशुतोष काळे यांनी निवडणूक निसटत्या मतांनी जिंकली . यानंतर काम पूर्णत्वास नेण्यासाठी आपण काम करतोय हे दाखवण्याची नाटके केली यासाठी राज्य शासनाचा अब्जावधी रुपयांचा निधी मातीत घातला परंतु अनेक वर्षापासून आजपर्यंत हे काम अपूर्ण असून ते काम कधी पूर्ण होईल याची शाश्वती नसल्याने या उन्हाळ्यात जनतेला भिषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागेल.अशी भिती विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.
यावेळी नागरी सत्कारास उत्तर देताना सलग आठ वेळा आणि आगामी दोन महिन्यात व नव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद महागुरू आणि केंद्र सरकारचा राष्ट्रीय आयुर्वेद अवार्ड पुरस्कार प्राप्तकर्ते आयुर्वेदाचार्य रामदास आव्हाड यांनी गेल्या ३७ वर्षातील अनंत अडचणीतून मार्ग काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना उजाळा देतांना मला नासिक येथील आयुर्वेद महाविद्यालयातून गोल्ड मेडल मिळवले नंतर पुस्तकी ज्ञानापेक्षा रुग्णांकडून उपचार करतांना विविध अनुभव व बऱ्या झालेल्या रुग्णांच्या दुव्याने घडत गेलो . श्रीसाई कृपेने व श्रीसाई रुग्णालयात गेली १५ वर्षातील अखंड आयुर्वेद उपचार करतांना मी देशात नव्हे तर जागतिक पातळीवर कधी लोकमान्य झालो मला कळले नाही मला याकाळात ४४ आंतरराष्ट्रीय, देश, राज्य पातळीवर पुरस्कार कोणताही अर्ज अथवा शिफारस न करता मिळाले. आज पर्यंत मी रुग्णांच्या सहकार्याने देशभरातील ७०००आयुर्वेदाचार्य विद्द्यार्थ्यी यशस्वी रित्या मोबदलाही न घेता घडविले. मी कमीतकमी फी व अपेक्षेने रुग्णसेवा घडवितो. आमच्या परिवारात विविध शाखा व उपचार पध्दतीचे १३ डॉक्टर आहेत. *लवकरच* *कोपरगाव येथे आयुर्वेद उपचार व औषधी संशोधन इन्स्टिट्यूट सुरू करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.
गेले पंधरा वर्षांपासून अनेकवेळा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांनी डॉक्टर तुम्ही कोपरगावचे नाव देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविले असून तुमचा कोपरगावकरांच्या वतीने सत्कार करण्यात येईल अशी इच्छा व्यक्त केली. परंतु त्यांच्या पश्चात माझा नागरी सत्कार प्रथम महिला आमदार सौ.स्नेहृलता कोल्हे आणि लाडका नातू विवेकभैय्या कोल्हे यांनी केला. माझे सर्वं पुरस्कार मी सर्व रुग्ण व जनतेच्या चरणी अर्पण करीत असल्याचे भावपूर्णपणे आयुर्वेदाचार्य रामदास आव्हाड यांनी सांगितले.
कोपरगाव व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि लायन्स क्लबचे वरिष्ठ पदाधिकारी राजेश ठोळे यांनी कोपरगाव शहरात व तालुक्यात उद्द्योजक ,कर्तबगार, सक्षम युवक – युवती यांची वाणवा नाही. हा परिसर उद्द्योग , व्यापारास पोषक आहे.कोणीही नैराश्य ग्रस्त न बनता रस्ते, दुहेरी रेल्वे, विमानतळ, समृद्धी , द्रुतगती महामार्ग यांचा लाभ घेत औद्द्योगिक व्यवसाय उद्योग उभारावेत .असे आवाहन केले.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँक
संचालक विवेक कोल्हे यांनी शिर्डी, कोपरगाव, येवला या शिर्डी – आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र, कोपरगाव :- अभियांत्रिकी तंत्रज्ञानव विकसित उद्योगाच़्या उत्पादन, विक्री ,वितरणाचे प्रशिक्षीत अधिकारी आणि कामगार ,ब्रॅंडेड आयडाॅलांची रेलचेल ,असलेली गंगोत्री *येवला-औद्योगिक विकास पोषक वातावरणात या त्रिवेणी संगमातून निर्मित स्काय या संकल्पनेवर आधारीत एक संयुक्त कॉर्पोरेट क्षेत्राची उभारणी या परिसराला न्याय देणार असल्याने विवेक कोल्हे यांची ही योजना राबविण्यात आम्ही सर्व व्यापारी सहकार्य करण्यास बांधील रहातील अशी आत्मविश्वास पूर्वक हमी दिली.
याशिवाय डॉ. अभय दगडे यांनी १४ अमेरिकेत जाऊन जैन धर्मातील दुर्मिळ लब्धीसार या प्राचीन पवित्र ग्रंथाचा प्राचीन जैन धर्मीय आणि भारतीय संस्कृतीतील अध्यात्म आणि विज्ञान यांच्या चिकित्सक कसोटीतून सध्या पिढीस सर्वांगीण दृष्टीने पोषक व मार्गदर्शक ठरणाराहिंदी भाषेतील सरळ सोप्या मायबोलीत केलेल्या अनुवाद जैन धर्मियांसह सकल भारतीयांना भावणारा ठरणार असल्याने. या ग्रंथाच्या अभ्यासातून जनकल्याण साधावे असे आवाहन डॉक्टर अभय दगडे यांनी केले
आपल्या धार्मिक वाटचालीचा आढावा घेतांना भारतीय संस्कृती मधील अध्यात्म आणि जीवन पध्दती जगात श्रेष्ठ असून आपल्या प्रत्येक वर्षांतील निर्जल उपवासावर अहोरात्र संशोधन व विज्ञान चिकित्सा करुन विकसित राष्ट्रातील डॉक्टरांनी नोबेल पारितोषिक मिळविले आहे. प्रत्येक मानवाने वेद ,प्राचिन धार्मिक ग्रंथांचा वैज्ञानिक कसोटी वर सखोल अभ्यास करून त्यातून मिळणारे संदेश प्रत्यक्ष आचरणात आणून मानव कल्याण साधण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिमीक्रार संदीप जाधव यांनी केले आभार पराग संधान यांनी मानले.