Breaking
ब्रेकिंग

अनुकूल – प्रतिकूल परिस्थितीत समय सुचकता,जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक परिश्रमातून उद्दोग यशस्वी होतो —- अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक विवेक कोल्हे

0 0 1 1 6 1

अनुकूल – प्रतिकूल परिस्थितीत समय सुचकता,जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक परिश्रमातून उद्दोग यशस्वी होतो —- अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक विवेक कोल्हे

🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क

कोपरगाव- येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कॉलेजमधील बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) विभागाच्या वतीने उद्योजकता विकास मंचाचे उद्घाटन (Entrepreneurship Development Cell) अंतर्गत “एक यशस्वी उद्योजक कसे व्हावे”या विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्याला उद्योजकतेचे महत्त्व आणि यशस्वी उद्योजक कसे व्हायचे हे कळावे,या उद्देशाने आयोजित सदर कार्यक्रमाचे उदघाटन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष मा. विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे मा.प्र.प्राचार्य डॉ.सानप आर.आर.यांनी भूषविले. मा.विवेक बिपीनदादा कोल्हे, यांनी आपल्या भाषणातून उद्योजकाचे विविध पैलू, त्याचे महत्त्व, संधी आणि आव्हाने, यशस्वी उद्योजकांची उदाहरणे याविषयी माहिती दिली.


आपल्या उद्घाटनपर भाषणात ते पुढे म्हणाले की, अनुकूल – प्रतिकूल परिस्थितीत समय सुचकता जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक परिश्रमातून उद्दोग यशस्वी होतो.सुदैवाने पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी व नामदार एकनाथ शिंदें यांच्या शासनानेअनेक सुविधा आणि संधी उपलब्ध करून दिल्या आहे

 “ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या संधींचा फायदा घेऊन मोठा व्यवसाय कसा सुरू करता येतो, याची अनेक उदाहरणे आमच्याकडे आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी नेहमीच उभा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात जरूर व्यवसाय सुरू करावा”. यावेळी विद्यार्थ्यांनी नवीन व्यवसायाबद्दल विचारलेल्या सर्व प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्राचार्य डॉ.आर.आर.सानप यांनीही आपले अनुभव सांगून विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी , ‘विवेकभैय्या यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना यश निश्चितच मिळेल’असे आवर्जून सांगितले.

बी.बी.ए. विभागाचे प्रमुख. श्री.साळवे एन.बी.,आणि त्यांचे सहकारी श्रीमती गांधी सी.एम., श्री. गवारे एम.बी., कु.जाधव एस.एस. यांच्या मदतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. प्रतिमा पूजनाने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विभागप्रमुख श्री. साळवे एन.बी. यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.संस्कृती गायकवाड व कु.ऋतुजा मोहिते यांनी केले तर आभार कु.पायल वाघ यांनी मानले.

सदर कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे