आमदार आशुतोष काळे आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँक माजी संचालिका सौ.चैताली काळे यांच्या शुभ हस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त ‘राउडी मोमो कॅफे’ चे उद्घाटन
संपादक - अरुण आहेर
आमदार आशुतोष काळे आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँक माजी संचालिका सौ.चैताली काळे यांच्या शुभ हस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त ‘राउडी मोमो कॅफे’ चे उद्घाटन
कोपरगाव शहरातील ४० वर्षातील पाणी प्रश्न आमदार आशुतोष काळे यांनी सोडविल्याचा अभिमान !!! हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल सर्वांचे आभार !!!
भावी काळात विविध स्वरूपात असेच सहकार्य राष्ट्रवादी काँग्रेस, आमदार काळे कुटुंबियांना द्यावें हीच नम्र विनंती !!!!
– आपले नम्र –
माजी आमदार अशोकराव शंकरराव काळे,
विद्यमान आमदार आशुतोष अशोकराव काळे, कोपरगांवअरूण आहेर
🔥 आग न्यूज पोर्टल दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल ९४२२७६४५३३
🔥 आग न्यूज पोर्टल
कोपरगांव – सर्वांगीण विकास अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करताना प्रगत तंत्रज्ञानात रोजगार निर्मिती कमी होत असल्याने युवकांनी स्वयंरोजगारातून इतरांना रोजगार पुरविला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल याची सदहेतूने अखील भारतीय व्हॉलीबॉल पटू स्व.वसंतराव गंगुले कुटुंबिया़तील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले व माजी नगरसेविका श्रीमती हिरामण वर्षा गंगूले यांच्या मार्गदर्शनाखाली राउडी मोमो कॅफेचे उद्घाटन करून दुर्गेश व तेजस गंगूले तरुणांपुढे एक आदर्श परंपरा निर्माण केल्याचे गौरवोद्गार आमदार आशुतोष काळे यांनी काढले.
भारतीय व्हालीबॉलपटू स्व. वसंतराव गंगुले यांच्या गंगूले कुटुंबियांच्या वतीने कोपरगांवी युवा – युवतीसाठी सुरु करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध ‘राउडी मोमो कॅफे’चे उद्घाटन आमदार आशुतोष काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँक माजी संचालिका सौ चैताली काळे यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी बोलताना काढले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी भुषविले.
या प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी राष्ट्रीय व्हालीबॉलपटू, माजी नगरसेवक स्व.वसंतराव गंगुले आणि स्व.हिरामण गंगुले यांच्या आदर्शवादी संस्कारातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, रणजित गंगूले, माजी नगरसेविका श्रीमती वर्षा गंगूले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने. दुर्गेश व तेजस गंगूले यांनी अत्यंत जिद्दीने परिश्रमपूर्वक सेवेतून तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या चवदार खाद्द्यपदार्थ कोपरगांव सारख्या ग्रामीण भागात उपलब्ध करून दिले ही भुषणाह घटना आहे .
मुंबई पुणे शहरातील मृगजळ नोकऱ्यांच्या मागे न धावता स्थानिक पातळीवर युवकांनी रोजगार निर्मिती घडवावी.तसेच ग्राहकांनी मुंबई पुणे आदी प्रगत शहरातील भूलभुलैयाला न भुलून स्वतः ची फसवणूक करून घेण्यापेक्षा कमीत कमी खर्चात दर्जेदार विश्वासार्ह माल खरेदीने स्थानिक बाजारपेठ फलवावी असे कळकळीचे आवाहन केले.
या वेळी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक माजी संचालिका संचालिका सौ. चैताली काळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेविका वर्षा गंगूले, मनसेचे सुनील फंड,रणजित गंगूले, दुर्गेश गंगूले, तेजस गंगूले व गंगूले कुटुंबीय, वैभव सोमासे, राहुल वाकळे, विजय गुंजाळ, आदित्य मराठे, नितीन नरसाळे आदी उपस्थित होते.