Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

केंद्र सरकारच्या सहभागातून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत सात लाख व परदेशात १५ लाख रूपयांची पंतप्रधान विद्या लक्ष्मी कर्ज आणि शिष्यवृत्ती योजना २०२४ सुविधा प्रारंभ !!

संपादक : अरुण आहेर

0 0 1 9 4 7

आत्मा मालिक
दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी डॉ.पार्थ देवगावकर आत्मा मालिक हॉस्पिटल, नगर – मनमाड रोड, कोकमठाण ता.कोपरगांव येथे येत असतात….
डॉ.पार्थ देवगावकर.(किडनी रोग) तज्ञ रुग्ण तपासणी साठी उपलब्ध असतील.. तरी गरजू रुग्णांनी हॉस्पिटलला येऊन तपासणी करून घ्यावी अशी नम्र विनंती….
संपर्क- 7304755655

🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क    ९०९६६६४५३३

केंद्र सरकारच्या सहभागातून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत सात लाख व परदेशात १५ लाख रूपयांची पंतप्रधान विद्या लक्ष्मी कर्ज आणि शिष्यवृत्ती योजना २०२४ सुविधा प्रारंभ !!

🔥 आग न्यूज पोर्टल

कोपरगाव : केंद्र सरकारने देशातील वंचित गुणवंत विद्यार्थींना दर्जेदार शिक्षणाकरिता पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजना २०२४ सरकारच्या या योजने अंतर्गत मुलीला शिक्षणासाठी बँकेकडून साडे सात लाख रुपये आणि परदेशातील शिक्षणासाठी १५ लाख (PM Vidya Lakshmi Yojna 2024) रुपयांपर्यंतचे शैक्षणिक शिष्यवृत्ती व कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजने अंतर्गत शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज योजना संबंधित सर्व माहिती vidyalakshmi.co.in/Students/ या संकेतस्थळावर अधिकृतपणे मिळेल. या माहिती प्रमाणे विद्यार्थी, विद्यार्थींनी, पालक, शैक्षणिक संस्था चालक ऑनलाइन अर्ज देखील करू शकता.

शैक्षणिक कर्ज लाभ घेण्यासाठी करावयाच्या आवश्यक पूर्ततांची माहिती :

१) या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थिनीच्या नावाची नोंदणी vidyalakshmi.co.in/Students/ विद्या लक्ष्मी पोर्टलवर करा आणि लॉग इन करा.
२) सर्व आवश्यक संपूर्ण माहिती तपशीलवार सर्व साधारण शैक्षणिक कर्ज अर्ज [ Common Education Loan Application (CELAF) ] भरावे लागतील.
३) CELAF हा एकच फॉर्म तुम्ही अनेक बँका आणि योजनांमध्ये शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करण्यासाठी भरू शकता.
४) ह्या कर्ज योजनेचा कर्ज मागणी अर्ज इंडियन बँक्स असोसिएशनकरिता सर्व बँकां स्विकारतात.
५) फॉर्म भरल्यावर विद्यार्थी शैक्षणिक कर्जांची सविस्तर माहिती घेऊन गरजेनुसार आपल्या कर्ज फेडीच्या पात्रतेप्रमाणे शैक्षणिक कर्ज मागणी करु अथवा घेऊ शकतात.
६) विद्या लक्ष्मी पोर्टलवर विद्यार्थी CELAFच्या माध्यमातून जास्तीत जास्त तीन बँकांमध्ये अर्ज करू शकतात.
७) या योजनेत १३ बँका मार्फत आणि २२ प्रकारची शैक्षणिक कर्जे दिली जातात.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

१) आधार कार्ड किंवा व्होटर आयडी, पॅन कार्ड , पासपोर्ट साइज फोटो कॉपीज तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल या कागदपत्रांची आवश्यकता आहे. २) तीन वर्षांचा तहसीलदार यांचा दाखलाउत्पन्नाचा दाखला. ३) हायस्कूल आणि इंटरच्या मार्कशीटच्या फोटो कॉपी ४) शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या संस्थेचे प्रवेश पत्र ५)चालू आणि पुढील शिक्षणाकरिता आवश्यक कालावधी व यासाठी होणाऱ्या संपूर्ण खर्चाचा लेखी तपशील

इतर आवश्यक माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.

2/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे