संजीवनीच्या एम .ओ.युचे फलित तैवान शासकीय खर्चाने सहा विद्यार्थ्यांची तैवानच्या विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड-श्री अमित कोल्हे

संजीवनीच्या एम .ओ.युचे फलित तैवान शासकीय खर्चाने सहा विद्यार्थ्यांची तैवानच्या विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड-श्री अमित कोल्हे
अरूण आहेर 🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल /9096664533/arun aher4321@gmail.com arun aher0312@gmail.com
कोपरगांव—
संजीवनी युनिर्व्हसिटीच्या तृतिय वर्षातील तीन, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या तृतिय वर्षातील दोन व संजीवनी फार्मसी महाविद्यालयातील तृतिय वर्षातील एक, अशा सहा विद्यार्थ्यांची तैवान मधिल नॅशनल चॅन्ग चुंग युविर्व्हसिटी व आय-शौ युनिर्व्हसिटी मध्ये तीन ते सहा महिने कालावधीसाठी इंटर्नशिपसाठी (अंतर्वासिता) निवड झाली आहे. विशेष म्हणजे सहाही विद्यार्थ्यांचा विमान प्रवास, निवास, जेवण खर्च हा संपुर्ण तैवान सरकार करणार आहे. या शिवाय दैनंदिन इतर खर्चासाठी दरमहा १५ हजार न्यु तैवान डॉलर मानधनही देण्यात येणार आहे. हे सर्व संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स डीपार्टमेंटच्या पुढाकारने संजीवनी आणि तैवान मधिल युनिर्व्हसिटी मधील परस्पर सामंजस्य करारामुळे (एमओयु) शक्य झाले आहे, अशी माहिती संजीवनी युनिर्व्हसिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

श्री कोल्हे पुढे म्हणाले की सहाही विद्यार्थी तैवानला लवकरच मार्गस्थ होणार असुन तेथे ते तेथिल प्राद्यापकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्पाचा अभ्यास करून निष्कर्ष काढतील. यात संजीवनी युनिर्व्हसिटीच्या ईश्वरी कृष्णराव पवार, संकेत ज्ञानदेव जुंदारे, श्रीकांत लक्ष्मण पवार, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे प्रतिक्षा राजेंद्र सोनवणे, सायली विनोद देशमुख आणि फार्मसी महाविद्यालयाच्या प्रसाद बाळासाहेब चांदे यांचा समावेश आहे.

आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान प्रगल्भतेसाठी जागतिक व्यासपीठ मिळावे, या हेतुने अनेक परदेशी विद्यापीठांबरोबर संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीने एमओयु केलेले आहे. त्यामुळे आत्ता पर्यंत सुमारे २२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी कॅनडा, तैवान, रशिया , फिलिपाईन्स, लंडण, जपान, अमेरिका, आदी देशांमध्ये पूर्णतः प्रायोजीत (विनामुल्य) इंटर्नशिप पुर्ण करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी परदेशात तेथिल सरकारच्या खर्चाने एमएस पदवी (अभियांत्रिकी मधिल पदव्युत्तर पदवी) पुर्ण केली आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षाही अधिक आहे.
संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स डीपार्टमेंच्या या यशस्वी वाटचालीबध्दल संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच संजीवनी युनिर्व्हसिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी व्हाईस चांसलर डॉ. ए.जी. ठाकुर, डायरेक्टर डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स डीपार्टमेंचे डीन डॉ. महेंद्र गवळी, डीन डॉ. कविथा राणी, डॉ. एस.बी. दहिकर, डॉ . विनोद मालकर डॉ. सरीता पवार, डॉ. माधुरी जावळे, प्रा. एन. वाय. सिध्दीकी उपस्थित होते.
संजीवनी युनिर्व्हसिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांनी तैवान मधिल विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.सत्कारानंतर टिपलले छायाचित्र. यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.






