Breaking
ब्रेकिंग

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या तीन अभियंता मुलींची परसिस्टंट सिस्टिम्स मध्ये नोकरीसाठी निवड

0 0 1 1 6 3

 

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या तीन अभियंता मुलींची परसिस्टंट सिस्टिम्स मध्ये नोकरीसाठी निवड

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क

कोपरगाव —-
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या (टी अँड पी) विभागाच्या सातत्यपुर्ण प्रयत्नाने परसिस्टंट सिस्टिम्स या विविध उद्योग व आस्थापनांना त्यांच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर्स बनवुन देणाऱ्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील तीन नवोदित अभियंता मुलींची त्यांच्या अंतिम परीक्षा व निकाला अगोदरच आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा असल्यामुळे कंपन्यांच्या आवश्यकतेनुसार आधुनिक तंत्र ज्ञानाधिष्ठित अभ्यासक्रमाची रचना केलेली असल्यामुळे आम्हाला कंपनीने चांगले पॅकेज दिले, असे मुली सांगतात, अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.


परसिस्टंट सिस्टिम्स कंपनीने निवड केलेल्या अभियंता मुलींमध्ये निलम प्रभाकर हर्दे, भक्ती किरण जाधव व रूचा उदय रूद्रभाटे यांचा समावेश आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण अनुभवी व उच्चतम शैक्षणिक अर्हता प्राप्त प्राद्यापकांकडून विध्यार्थ्यांना दिले जाते. तसेच मुलाखतींना सामोरे जाण्यासाठी आपापल्या विद्याशाखांच्या सखोल ज्ञानाबरोबरच इंग्रजी संभाषण कौशल्य, देहबोली, विनम्रता, नेमके आणि मोजके उत्तर, अशा बाबींबरोबरच केशभुषा आणि वेशभूषा याचेही प्रशिक्षण दिल्या जाते, त्यामुळे संजीवनीचे अभियंते मोठ्या प्रमाणात नामांकित कंपन्यांच्या कसोटीत उतरत असून ग्रामीण भागातील युवक युवती नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण करीत आहेत.


संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांनी सर्व गुणवंत अभियंता मुली व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी तीनही नवोदित अभिंयता मुलींचे छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. डी. बी. क्षिरसागर, टी अँड पी विभागाचे डीन डॉ. व्ही. एम. तिडके उपस्थित होते.

माझे वडील येवला येथे टेलरींगचा व्यवसाय करून आमच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. मला एक भाऊ व एक बहिण आहे. माझ्या वडीलांनी आम्हाला जिध्दीने शिकविले. त्यांनी मला इ.१२ वी नंतर कोणते व कोठे शिक्षण घ्यायचे, याचे पुर्ण स्वातंत्र्य दिले होते. मी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या दर्जा व गुणवत्तेबाबत ऐकुण होते. त्यात या कॉलेजला ऑटोनॉमसचा दर्जा. म्हणुन मी येथेच कॉम्प्युटर इंजिनिअरींगला प्रवेश घेतला. आम्हाला आमच्या सर्व विषयांचे सखोल ज्ञान तर मिळालेच, परंतु मुलाखतीची पुर्ण तयारी करून घेतली. आमच्या मॉक इनर्व्ह्यूजही घेतल्या. या सर्व बाबींमुळे मी परसिस्टंट सिस्टिमची मुलाखत सहज देवु शकले आणि मला चांगली नोकरी मिळाली. यामुळे मी आमच्या कुटूंबातील नोकरीसाठी बाहेर जाणारी पहिली मुलगी ठरली, याचा मला अभिमान आहे. संजीवनीमुळे माझ्या आई वडीलांनी डोळ्यात साठविलेले स्वप्न मी पुर्ण करू शकले. -नवोदित अभियंता मुलगी भक्ती जाधव

 संजीवनी ग्रप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी तीन नवोदित अभियंता मुलींचा परसिस्टंट सिस्टिम्स मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र. यावेळी डॉ. ठाकुर, डॉ. क्षिरसागर व डॉ. तिडके उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे