Breaking
ब्रेकिंग

महायुती शासनाकडून मराठा आरक्षणाच्या ३५० वर्षाच्या संघर्षाला मुठमाती — कोपरगाव प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे

0 0 1 1 6 3

 

महायुती शासनाकडून मराठा आरक्षणाच्या ३५० वर्षाच्या संघर्षाला मुठमाती — कोपरगाव प्रथम महिला आमदार सौ स्नेहलता कोल्हे

🔥 आग न्युज पोर्टल नेटवर्क

कोपरगाव —
गेल्या १८८१,१९०१,१९२५ सालातील ब्रिटिश सरकारच्या गॅझेटमध्ये मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्गात समावेश केला होता यानंतर भारत रत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनीही हेच आरक्षण कायम ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु तत्कालीन सरकारांनी हे नाकारले. एवढ्यावरच आमच्या विरोधकांनीही समाधान न मानता आमच्या युती सरकारच्या काळात मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने शांततेत काढलेल्या ५५ अराजकीय स्वरूपातील महामोर्चांना कायम अपशकून केले . आमच्या विरोधी शासनाने सत्तेवर आल्यावर मराठा आरक्षण आंदोलनास केराची टोपली दाखवली.


परंतु मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी *मराठा आरक्षणासाठी आपला जीव मुठीत घेऊन प्राण पणाला लावून स्वबळावर उभारलेल्या अराजकीय लढ्यात विरोधकांनी छुप्या मार्गाने अनंत अडचणी निर्माण केल्या. पण मराठा समाज व मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या विरोधकांना खड्यासारखे दूर ठेवले.


मराठा समाज, मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील आणि पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री नाम अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस,व नाम अजित पवार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती संयमाने हाताळून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ओ. बी.सी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही स्वरूपात धक्का न लावता फार मोठा कायदेशीर अडथळा दुर केला आहे. यामुळेही चितपट विरोधकांथे पोटशूळ उठले असून आगामी लोकसभेसह सर्व निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आमचे विरोधक राज्यात मराठा आणि ओ.बी. सी . समाजामध्ये गैरसमज पसरवून जीवघेणा संघर्ष पेटविण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही तेव्हा मराठा समाज, ओ.बीसी व महायुती शासनाने योग्य काळजी घ्यावी.


मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयात व मागास प्रवर्ग आयोगाची अंतिम मान्यता मिळवून देण्यासाठी मराठा समाजातील सर्व बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन सौ स्नेहलता कोल्हे करून राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून न्याय दिल्याबद्दल पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री नाम. अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली

मुख्यमंत्री नाम . एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री नाम. देवेंद्र, फडणवीस,उपमुख्यमंत्री नाम. अजित पवार यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्या बद्दल मराठा समाजाच्यावतीने कोपरगाव पहिल्या महिला आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी राज्य सरकारचे आभार मानले

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल
युवानेते आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक विवेक कोल्हे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मानवंदना अर्पण करतांनाआजच मराठा आरक्षण आंदोलनाचा विजयी महोत्सव गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण कोपरगावातील मराठा बांधवांसोबत साजरा केला.

तसेच यावेळी मराठा आरक्षण संघर्षामध्ये आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व संघर्ष योद्ध्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याशिवाय कोपरगाव तालुक्यात गावपातळीवर हा विजयोत्सव मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे