महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या ५०० कोटी रुपये कर्जरोखे उभारणीत राज्यातील पतसंस्थांना सहभागी करून सहकार खात्याने ही गुंतविलेल्या रकमेचा सहकार खात्याने वैधानिक तरलता निधीमध्ये समावेश करावा तसेच राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या सर्व विषयांवर तातडीने बैठक बोलावून निर्णय घेऊ – उपमुख्यमंत्री मान. अजित पवार

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या ५०० कोटी रुपये कर्जरोखे उभारणीत राज्यातील पतसंस्थांना सहभागी करून सहकार खात्याने ही गुंतविलेल्या रकमेचा सहकार खात्याने वैधानिक तरलता निधीमध्ये समावेश करावा तसेच राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या सर्व विषयांवर तातडीने बैठक बोलावून निर्णय घेऊ – उपमुख्यमंत्री मान. अजित पवार
मुंबई :महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या ५०० कोटी रुपयांच्या कर्ज रोखे खरेदी मध्ये महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना सहभागी करून घेतांना गुंतवणूक केलेल्या रकमेचा वैधानिक तरलता निधीमध्ये समावेश करावा असे सहकार खात्याला आदेश देताना सर्व पतसंस्थांचे विविध प्रश्न आणि विषयांवर तातडीने बैठक बोलावून निर्णय घेणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रोखे वितरण कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान.अजित पवार यांनी दिली.
ग्रामीण महाराष्ट्रात पाच दशके अहोरात्र शिक्षण, सहकार क्षेत्रासह आशिया खंडातील अव्वल स्थान पटकावणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या मजबूत पाया उभारणीत स्व.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वस्व अर्पण करुनअद्वितीय क्रांती घडविणाऱ्या भाग्यविधाते कर्मवीर स्व . शंकरराव काळे साहेब आणि कर्मयोगी स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांच्या चरणी भावपूर्ण अभिवादन!!!
तसेच या दोन्ही परिवारांच्या तीन पिढ्यांनी आपल्या पिताश्रींच्या स्वप्नपूर्ती अतुलनीय एकसंघ कामगिरीसाठी भावी काळात ही परमेश्वराने त्यांना सर्व प्रकारचे बल देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
— अरुण आहेर 🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल/९०९६६६४५३३/९४२२७६४५३३/ arun aher4321@gmail.com/arun aher0312@gmail.com
या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन उपकार्याध्यक्ष चंद्रकांत वंजारी, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर उपस्थित होते.
सहकारी पतसंस्थांना वारंवार सहकार खात्याकडे विविध प्रश्नांच्या अनुषंगाने हेलपाटे मारावे लागतात. हेलपाटे मारावे लागणार नाही अशा प्रकारचे कायद्यात बदल करण्याच्या देखील सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. परंतु सहकारी पतसंस्थांनी देखील काही बंधने पाळण्याची गरज असल्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले.