एस.एस.जी.एम. महाविद्यालयात नवप्रवेशित विज्ञान,संगणक शास्त्र आणि सायबर सेक्युरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग संपन्न

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात नवप्रवेशित विज्ञान,संगणक शास्त्र आणि सायबर सेक्युरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग संपन्न
कोपरगाव, दि.२९ –: रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रथम वर्ष विज्ञान,संगणक शास्त्र, सायबर सेक्युरिटीच्या वर्गातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी बुधवार दि. २९ जुलै रोजी उद्बोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख, विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती तसेच करिअरविषयक मार्गदर्शन या कार्यक्रमातून देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व कौशल्यविकास उपक्रम राबविले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची प्रभावी ओळख व्हावी आणि महाविद्यालयीन शिक्षणाशी सहज जुळवून घेता यावे यासाठी ब्रिज कोर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविताना शिस्त, जबाबदारी आणि आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचे पालन करणे हेच यशस्वी व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.”
यावेळी विविध विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना आपल्या विभागांची तसेच महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी प्रा. दिलीप भोये, शिष्यवृत्ती योजनांविषयी श्री. धीरज सोनवणे, विद्यार्थी विकास मंडळाविषयी डॉ. माधव यशवंत, परीक्षा विभाग




