Breaking
नोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अभियंत्यांची नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड ; ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग पुर्ण करतोय ग्रामिण विद्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न

संपादक : अरुण आहेर

0 0 5 3 3 2

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अभियंत्यांची नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड ; ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग पुर्ण करतोय ग्रामिण विद्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न

🔥 आग न्यूज नेटवर्क

कोपरगांव : आपल्या पाल्याला नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या शाश्वत विश्वासाने पालक आपल्या पाल्यांना संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षणसाठी प्रवेशित करतात. याच विश्वासाचा ध्यास घेवुन संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग शाखानिहाय विविध नामांकित कंपन्यांशी संपर्क साधुन कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करतो. अशाच प्रयत्नांमधुन अलिकडेच पाच नामांकित कंपन्यांनी नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. अशा प्रकारे दरवर्षी टी अँड पी विभाग शेकडो ग्रामीण विद्यार्थ्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण करीत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरींग व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या अभियंत्यांचा समावेश आहे. यात अप्लाईड एआय कंपनी, ईगल बाईट ,सी डॅक , नेत्रवाला मितुशा ,सी डॅक, प्रायमसमध्ये विविध शाखेतील अभियंत्यांची निवड झाली आहे.

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासुन ऑटोनॉमस दर्जा प्राप्त झालेला असल्यामुळे कंपन्यांच्या गरजेनुसार आधुनिक तंत्रज्ञान विषयक अभ्यासक्रम समावेश करण्याची स्वायत्ता आहे. यामुळे पुर्वीची अनेक कामांना योग्य हात नाही तर अनेक हातांना काम नाही, ही विसंगती दुर झाली आहे. याचा परीपाक म्हणुन मागील वर्षी पहिली ऑटोनॉमस बॅच बाहेर पडली, या बॅचच्या तब्बल ७७० अभियंत्यांना टी अँड पी विभागाने नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन दिल्या. चालु वर्षीही या विभागाची दमदार कामगिरी सुरू आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी वरील सर्व निवड झालेल्या नवोदित अभियंत्यांचे, त्यांच्या पालकांचे, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, टी अँड पी विभागाचे डीन डॉ. विशाल तिडके व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 3 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे