Breaking
ब्रेकिंगराजकिय

नागरी व मल्टीस्टेट पतसंस्थांच्या अधिक सुरक्षिततेसाठी कायद्यात सुधारणा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील नागरी सहकारी व मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक, सक्षम आणि सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर सुधारणा करण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्रातील नागरी सहकारी व मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री यांनी सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे तसेच राज्य मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे, अहिल्यानगर जिल्हा स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष शिवाजीआप्पा कपाळे,  मल्टीस्टेट फेडरेशनचे संचालक कडुभाऊ काळे, रवींद्र कानडे, जितेंद्र जैन,सुकुमार पाटील अँड.गडगे साहेब यांचा समावेश होता. बैठकीदरम्यान नागरी सहकारी व मल्टीस्टेट पतसंस्थांसमोरील विविध अडचणी, विद्यमान कायद्यांतील त्रुटी, सभासद व ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर सुधारणांबाबत चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य शासन या क्षेत्रातील आवश्यक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असून, पतसंस्थांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी योग्य त्या क

0 0 5 2 4 4

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 2 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे