Breaking
ब्रेकिंग

आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगांव तालुक्यातअवघ्या सात वर्षात घडविलेल्या यशस्वी विकासाच्या धडकीने विरोधकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात — आमदार आशुतोष काळे

0 0 4 2 7 1

आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगांव तालुक्यातअवघ्या सात वर्षात घडविलेल्या यशस्वी विकासाच्या धडकीने विरोधकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात — आमदार आशुतोष काळे


अरूण आहेर 🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल/9096664533/ arun aher4321@gmail.com/arun aher 0312 @gmaik.com

कोपरगाव — विरोधकांनी सलग 40 वर्षे केलेल्या विकासापेक्षा आम्ही अवघ्या 7 वर्षातील केलेल्या यशस्वी विकासाने विरोधकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचे समजूतीने विरोधक आमच्यावर करीत असलेल्या बेताल आरोपांना आगामी नगरपालिका, तालुका पंचायत समिती,जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक, काही ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत योग्य उत्तर देतांना आमची राजकीय पकड पूर्वी पेक्षा निश्चितच दुपटीने मजबूत करु अशी ठाम ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 71व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना दिली. .


गौतम सहकारी उद्योग समूहाचे अध्यक्ष व माजी आमदार अशोक काळे यांच्या शुभहस्ते आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात बोलतांना आम. काळे पुढे म्हणाले,
कोपरगाव व राहाता तालुक्याला पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून वाया जाणारे पाणी मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वस्व पणाला लावीत असल्याने आमच्या पाठपुराव्यामुळे यावर्षी किमान अडीच टीएमसी जादा पाणी मिळणार असल्याने यावेळी पाच पाणी पुरवठा आवर्तनाचा लाभ मिळणार आहे.

गोदावरी उजव्या – डाव्या कालवा खोलीकरण,नूतनीकरण व मजबूत करण कामांना वेग आला आहे. ज्याठिकाणी कायम कालवा आणि चाऱ्या फुटतात तेथे कायमस्वरूपी सिमेंट कॉंक्रिटीकरण केले जात आहे यामुळे कमी काळात जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध होणार तसेच नासिक,अहिल्या नगर जिल्ह्यातील जायकवाडी धरण भरेल एवढे पाणी जायकवाडीत पोहोचले असल्याने भावी काळात मराठवाड्यात किमान दोन वर्षें पाणी टंचाई जाणवणार नाही.


ऊस उत्पादकांनीअशा परिस्थितीत अतिरिक्त पाणी , ऐ. आय. अत्याधुनिक प्रणाली व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 100 ऊस उत्पादन योजनेचा लाभ घेऊन एकरी उत्पादनात प्रचंड वाढ करुन जास्तीत जास्त भाव मिळविण्यात यशस्वी व्हावे असे कळकळीचे आवाहन कारखाना अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी करतांना
या वर्षी गेली सहा महिन्यांपासून महाराष्ट्र अती वृष्टीचा बळी ठरला असतांनाच आगामी दोन महिने ही परिस्थिती कायम रहाणार असल्याची भाकिते करण्यात हवामान तज्ञात चुरस निर्माण झाली आहे. सध्या खरीप वाया गेला असून रब्बी हंगामातील मशागत, लागवड करण्यात विलंब होणार असल्याने सर्वच पिक उत्पादनात अनिश्चितता निर्माण झाली आहे, अनेक ठिकाणी ऊस लोळला आहे.

उशीरापर्यंत ऊस गळीताने अनेक पटींनी समस्या निर्माण झाल्या आहेत अशा साखर उपपदार्थ निर्मितीवर अनिष्ट परिणामाचा धोका निर्माण झाला आहे.

अशाही अनिश्चित व दयनीय परिस्थितीत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना यावर मात करून जिल्ह्यात ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देण्यात यशस्वी होईल अशी ठाम ग्वाही अध्यक्ष आशुतोष काळे यांनी दिली.


कार्यक्रम सूत्र संचालन माजी संचालक अरुण चंद्रे आणि आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रविण शिंदे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे