धवल क्रांती कारक स्व. नामदेवराव परजणे पाटील यांचं गोदावरी खोरे दुध उत्पादक संघात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापराच स्वप्नं अखेर सुवर्णमहोत्सवी वर्षात साकारले राष्ट्रीय मिल्कडेअरी विकास बोर्डाचे संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ आणि नामदेवराव परजणे गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे

धवल क्रांती कारक स्व. नामदेवराव परजणे पाटील यांचं गोदावरी खोरे दुध उत्पादक संघात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापराच स्वप्नं अखेर सुवर्णमहोत्सवी वर्षात साकारले राष्ट्रीय मिल्कडेअरी विकास बोर्डाचे संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ आणि नामदेवराव परजणे गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे
कोपरगाव — कोपरगांव तालुक्यातील ग्रामीण जनतेला कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यासाठी स्व. नामदेवराव परजणे यांनी गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघ स्थापन करून सर्वस्व पणाला लावीत राज्यातील धवल क्रांतीत अव्वल स्थानावर आणला.
या पन्नास वर्षात नामदेवराव परजणे गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघ अनंत संकटांवर पद्मभूषण स्व. बाळासाहेब विखे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे यांच्या खंबीर पाठबळ सहकार्याने संचालक मंडळ,दुध उत्पादक मदतीने मात करण्यात यशस्वी ठरला .
या अर्धशतकी यशस्वी बळावर भावी काळात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विकसित सुविधेच्या तंत्रज्ञान वापराने दुध उत्पादक आणि ग्राहक यांना दर्जेदार उत्पादन विक्रीतून जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी विविध प्रकारच्या अनेक प्रकल्प उभारणीआणि योजनांच्या अंमलबजावणीत दुध संघ सतत आघाडीवर राहिला आहे.
पन्नासाव्या वर्षांत पदार्पणानिमित्त नामदेवराव परजणे गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघाचे कार्यक्षेत्रात ५० टक्के वीज किंमत बचत घडविणारा दीड मेगावॉट सौर उर्जा वीजनिर्मिती प्रकल्प उभारणी, ग्राहकांना आरोग्यदायी सूक्ष्म निर्जंतुकीकरणासाठी नवीन मिल्क क्लोरिफायर मशीन , अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित खवा निर्मितीकरिता कन्ट्युअस खवा मेकिंग मशिन, अत्याधुनिक जलशुद्धीकरण व जलसाठवण प्रकल्प, कर्मचारी वसाहत उभारणी शुभारंभ २० जानेवारी २०२५ रोजी सोमवारी सकाळी १० वाजता नामदेवराव परजणे गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघ कार्यस्थळावर राजस्थान राज्याचे राज्यपाल नामदार हरीभाऊ बागडे, महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे, कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे, राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळ अध्यक्ष दिनेश शाह, आमदार आशुतोष काळे, आमदार रमेश बोरनारे , आमदार विठ्ठल लंघे , आमदार अमोल खताळ, आमदार काशिनाथ दाते आदी मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आल्याची माहिती देतांना दुध संघ अध्यक्ष राजेश परजणे यांनी देताना या प्रसंगी उपस्थित रहावे असे कळकळीचे आवाहन केले.