कोपरगांव ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

कोपरगांव ग्राहक सन्मान योजनेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगांव —
सणासुदीच्या पर्वावर स्थानिक व्यापाराला चालना मिळावी यासाठी आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांनी सुरु केलेल्या ‘आपली खरेदी आपल्या कोपरगावमध्ये’ ह्या संकल्पनेला पुढे नेत कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्राहक सन्मान योजने’चा बक्षीस वितरण सोहळा आज आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते व सुप्रसिद्ध उद्योजक संजय मालपाणी समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक विवेक कोल्हे,आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कोपरगावच्या स्थानिक बाजारपेठेला चालना देण्यासाठी आमदार मा.श्री. आशुतोष काळे यांनी ‘आपली खरेदी आपल्या कोपरगावमध्ये’ हे अभियान सुरु केले होते.
त्यांनी स्वतः दिवाळीला अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालिका सौ. चैताली काळे यांच्यासह स्थानिक बाजारपेठेत खरेदी करत ह्या अभियानाला सुरुवात केली होती.
यावेळी तुलसीदास खुबाणी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद्र बागरेचा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुधीर डागा, प्रदीप साखरे, अजित लोहाडे, राजेंद्र बंब, राम थोरे, सुमित भट्टड, मोहन उकिरडे, किरण शिरोडे, तुषार घोडके, गुलशन होडे, संदीप राशिकर, पवन डागा, संदीप काबरा, प्रदीप मुंदडा, श्याम जंगम आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, सोशल मेडिया सेलचे प्रदेश सरचिटणीस अशोक आव्हाटे, मंदार पहाडे, रमेश गवळी, गौतम सहकारी बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, राजेंद्र खैरनार, शैलेश साबळे, गणेश बोरुडे, सोमनाथ आढाव, नारायण लांडगे, संतोष शेजवळ, अनिरुद्ध काळे आदींसह व्यापारी बांधव उपस्थित होते.