सहस्र कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब — नारायण अग्रवाल

सहस्र कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब — नारायण अग्रवाल
संपूर्ण भारतभर सर्व दिशांना मध्यवर्ती असलेल्या भगवंत, संत ऋषी , मुनी आदी क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या महात्म्यांच्या कर्मभूमीत ,पर्जन्य छायेच्या प्रदेशात कायमस्वरूपी दर पाच वर्षांत दोन वर्षे दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो.
80% कृषी उद्योगावर येथील जनता जनता अवलंबून आहे . स्वतंत्र पाणी स्त्रोत उपलब्ध नसलेल्या कोपरगांव तालुक्यातील प्रदेशाला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी परमेश्वराने या पुण्य भुमीत कर्मयोगी स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्या रुपात बिजारोपण करुन येथील केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर सर्व सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर स्वबळावर उभे करण्यासाठी या भुमीत जन्माला पाठविले.
यात दुग्ध शर्करा योग म्हणजे या बिजारोपणाला फक्त कोल्हे कुटुंबियांच्या एका पिढीची नव्हे तर तब्बल चार पिढ्यांचे प्रबळ पाठबळ लाभले.
सामान्य जनतेबरोबर स्वतःसह कोल्हे परिवाराने अनंत संकटांवर मात करण्यासाठी अनेक वर्षांपासून खस्ता खाल्ल्या पण उकिरड्याचे पांग फिटते या नियतीच्या खेळी नुसार कर्मयोगी कोल्हे साहेब या परिसराचा भारताचा कॅलिफोर्निया बनविण्यात काही काळ यशस्वी ठरले.
परंतु सन1970 नंतर लागोपाठ कोपरगांव तालुक्यावर आजपर्यंत विघ्नकारक अनेक संकटे राजकीय, शासकीय धोरणे, आपसात आपलं अस्तित्व आणि वर्चस्व टिकवण्याचे व इतरांना उध्वस्त करण्याचे मार्गांनी कोसळली.
यात प्रथम बेकायदेशीर स्थानिक जनतेच्या प्रखर विरोधाला न जुमानता जायकवाडी धरण निर्मिती, कोपरगांव तालुक्याचे विभाजन , सहकारी साखर कारखाने, सहकारी विविध संस्था मोडीत काढण्याचे अघोरी कुटील कारस्थाने , विकासात्मक कायमस्वरूपी अडथळे , ब्रिटिश सरकार पासून हक्काचे विविध धरणातून मिळणारे किमान 8 टी.एम.सी. पाणी शासनाच्या मदतीने नासिक आणि मराठवाड्याने पळविले. कोपरगावकरावरील एवढ्यावर हे संकट थांबले नाही तर कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांनी शासन व संजीवनी उद्योग समूहाचे बळावर सर्वस्व पणाला लावून नासिक जिल्ह्यातील पर्यायी 17 लहान मोठ्या धरणासह गोदावरी पात्रात कोल्हापूर पध्दतीचे बंधारेव निळवंडे धरण निर्मितीसह जीवघेणा विरोध मोडीत काढून बऱ्याच प्रमाणात यश मिळवले परंतु स्थानिक असंतुष्ट आत्म्यांनी संघटीत पुणे हाही प्रयत्न धुळीस मिळविला यांची फळ सामान्य जनता भोगीत आहे.
अशा परिस्थितीत कर्मयोगी कोल्हे साहेब डगमगले नाही व कधी खचले नाही कारण त्यांच्या चार पिढ्यांनी खूप भोगलय. म्हणूनच संपूर्ण विरोधी दडपणाविरूध्द अती प्रचंड जोशात ते लढत राहिले आणि हेच संस्कार अत्युच्च पातळीवर आपल्या कुटुंबियांच्या रोमारोमांत भिनवले. थोड्या थिडक्यात नव्हे तर गेली 70 वर्षे अहोरात्र कर्मयोगी कोल्हे साहेब व कुटुंबियांनी यांनी काळ्या आईशी इमान राखत सर्व सामान्य जनकल्याणासाठी आपल्या जीवनाची आहुती केव्हांच दिली आहे.
70 वर्षांत ऊस उत्पादकांना खाजगी साखर कारखान्यांकडून वेळेवर ऊस खरेदी रक्कम मिळविण्यासाठी चालू ऊस गव्हाणीत उड्या मारून प्रशासनास नमविले.
, शेतकऱ्यांना कर्ज सहज मिळवून देणे ,शेतकऱ्यांच्या कामधेनू संजीवनी सहकारी साखर कारखान्याची तत्कालीन शासनांनी 11 वेळा परवानगी नाकारली परंतु ती परत मिळविली., संजीवनी उद्योग समूहाचे माध्यमातून कोपरगांव , गणेश, संजीवनी सहकारी साखर कारखाने, गोदावरीसह दोन सहकारी दूध उत्पादक संघ स्थापना, कोपरगांव तालुका विकास मंडळ, कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहत, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, देवयानी सहकारी बॅंक , संजीवनी सहकारी पतसंस्था स्थापना, आय.टी.आय. अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक , इंग्रजी व मराठी माध्यमिक, विद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, आश्रमशाळा, इंटरनॅशनल स्कूल, सैनिकी शाळा, आदी सह संजीवनी ग्रामीण विद्यापीठ स्थापना, महिला बचत गटांमार्फत किमान 15000 महिला उद्योजक निर्मिती, झाली .
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय पॉलिटेक्निक मार्फत आतापर्यंत लाखो युवक, अर्ध कुशलांना व्यावसायिक प्रशिक्षण व नोकरीच्या संधी,
खंडकरी शेतकऱ्यांना जमीनी परत करणे, शेतकऱ्यांना कमी व्याजदरासाठी रिझर्व्ह बँकेवर रूम्हणे पायी मोर्चा, शेतकऱ्यांना जीवनावश्यक, विविध उद्योग, अत्यावश्यक यंत्रणा खरेदीसाठी कर्ज उपलब्धी,
प्रगत राष्ट्र व जागतिक व्यापार संघटनेच्या मार्फत विकसनशील आणि अप्रगत राष्ट्रांची होणारी लूट, फसवणूक याला मोठ्या प्रमाणात प्रतीबंध केला. यामुळे अप्रगत , विकसनशील देशांतील कृषी माल आयात — निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी फायदा मिळवून दिला.
देशातील साखर, दुध, कृषी माल उत्पादकांना योग्य भाव मिळवून देणे,
सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोदावरी डाव्या उजव्या कालव्यांची कायम दुरूस्ती,
पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून वाया जाणारे पाणी पूर्व दिशेला वळवून मराठवाडा, अहिल्या नगर, नासिक जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी कायम एकाकी स्वपक्ष,मित्र, शासनाच्या विरोधात वेळ प्रसंगी प्रखरपणे लढे दिले . याचमुळे कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब व त्यांच्या कुटुंबीयांना अनेक संकटाला सामोरे जावे लागले. व आजही जावें लागत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे गत 70 वर्षांत या परिसरात एकही नैसर्गिक, मानवी ,आरोग्यदायी, वयैक्तिक संकट नाही की, स्वतःहून सर्व प्रकारची मदत करण्यात कोल्हे परिवाराचा कोणीच हात धरु शकले नाही. शकत नाही.
याचमुळे संपूर्ण देशात शेतकरी आत्महत्या विक्रम घडवित असतानाच कोपरगांव तालुक्यात गत 70 वर्षांपासून एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशा अपवादात्मक घटना घडल्या असल्या तरी त्यांना कोल्हे साहेब व यांच्या कुटुंबियांनी खुल्या हाताने भरघोस मदत केली. .
कर्मयोगी कोल्हे साहेब व परिसरातील सर्व सदस्यांनी कोरोना साथीत संजीवनी उद्योग व शिक्षण समूहाचे व स्वतः पदरमोडीतून सर्व रुग्ण, जेष्ठ नागरिक घरपोच दोन वेळेस जेवण कोरोना प्रतिबंधक मास्क, औषधे, सॅनेटायझर , औषधे सलग तीन वर्षे पुरविली,
. मयत रूग्णांचे वारसांना शासकीय मदतीसह स्वतः आर्थिक मदत करण्यात आली.
सर्वात गौरवास्पद म्हणजे आज पर्यंत शेकडो मुला- मुलींचे सामुदायिक विवाह सोहळे पार पाडले. कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब हे प्रत्येक प्रसंग, समस्येचे मुळाशी जाऊन त्यातील अडचणी व त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील. यांची पूर्ण माहिती घेत आणि वेळ प्रसंगी स्वतः पदरमोड करण्यात तयारी करीत असल्याने व कोणत्याही स्वरूपात तडजोड करीत नसल्याने जनतेला सतत न्याय मिळवून देण्यात हे कुटुंब कायम जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले.
अशा या महान कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब व कुटुंबियांची या परिसरातील जनता आजीवन ऋणी राहील. .
कर्मयोगी कोल्हे साहेब यांच्या चिरंजीवी आत्म्यास कायमस्वरूपी सर्वोत्तम सद्गती व शांती लाभो
तसेच कोल्हे परिवाराकडून कायमस्वरूपी सर्वोत्तम सेवा घडविण्यासाठी परमेश्वराने सर्व प्रकारचे बल व सुखसमृद्धी सुखदायक आरोग्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!
कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या संस्कारांचा ठेवा वाढविण्यासाठी व त्यांचे सदुपयोगाकरिता त्यांचे तिसरे पुण्यस्मरण व 96 व्या जयंती सोहळ्यानिमित्त दिनांक 16 ते 23 मार्चला कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्टच्या वतीने कोपरगाव येथील तहसील कार्यालयालगत मैदानावर सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत ह.भ.प. सोनाली माऊली कर्पे चकलंबाकर जिल्हा बीड यांचे ओघावती अमोल सुमधुर वाणीतील श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
ह. भ.प. सोनाली माऊली 1100 वर्षांची अध्यात्मिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सद्गुरू कल्याण स्वामी महाराज संजीवन मठाचा वारसा जोपासणाऱ्या आहेत.
शास्त्रीय संगीत विशारद सोनाली माऊली गेले 20 वर्षांपासून संपूर्ण भारतभर किर्तनसेवा करीत असल्याने कोट्यवधी भाविकांचा सत्संग या मठाचा व सोनाली माऊली यांच्या सेवेत सहभागी झाले आहे.
ह.भ.प.सोनाली माऊली यांनी संपूर्ण भारतात पहिली अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. अनंत संकटांवर मात करीत 250 ते 300 मुली दरवर्षी किर्तन व अध्यात्मिक शिक्षणात पारंगत होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी देहू ते पंढरपूर पायी पालखी दिंडीत केवळ मुलींच या संस्थेच्या माध्यमातून सहभागी होतात.
अशा आध्यात्मिक वारसदार सोनाली माऊली यांच्या सुमधुर वाणीतून श्री राम कथा श्रवण लाभ हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा असे कळकळीचे आवाहन नारायण अग्रवाल यांनी केले आहे